The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

ग्रामीण🛖 भागातील आई वडिलांनी मुलाला CA 🎓कसे बनवले बघा | संघर्षमय प्रवास | Paayvata | Interview

Follow
Paayvata

गाव सोडले आणि आपल्या मुलाला CA बनवून दाखवले | संघर्षमय प्रवास | Paayvata

#paayvata #payvata #inspirationalstory

गणू CA झाला...
हो खरंच झाला...
घरकाम करणाऱ्या आईचा मुलगा..हमाली करणाऱ्या बापाचा गणू CA झाला...
हो खरंच झाला...
घरकाम करणाऱ्या आईचा मुलगा..हमाली करणाऱ्या बापाचा मुलगा मुलगा सिए झाला...
आमच्या रंज्या वहिनीचा पोरगा आज CA सारखी एक प्रतिष्ठित समजली जाणारी परीक्षा पास झाला.
वडील मुंबईला चहाच्या दुकानात काम करत होते.. आई दिवसभर कामासाठी रानात असायची आणि हा पाच सहा वर्षाचा गणू घरी दोन लहान बहिणींना सांभाळायला असायचा. माझ्या समोरच्या घरातील त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचाली नजरेसमोर होत्या...
सहा वर्षाचा मुलगा आईला शेतातून यायला उशीर होईल म्हणून आई यायच्या आधी जेवण बनवून ठेवायचा. आमची घरे गावात सर्वात खालील भागात होती त्यामुळे पाऊस पडला की गावातून वाहून येणारे पाणी गणूच्या घरात शिरायचे..घरात पाणी शिरायला सुरुवात झाली की गणुची तारांबळ उडायची...पुनम ला शिव्या घालायचा..लवकर लवकर माती आणून दे म्हणून ओरडायचा दोघे जण त्या चिमुकल्या हातांनी जमेल तेवढी माती आणून दाराच्या समोर बांध घालून पाणी अडवण्याचा प्रयत्न करायचे. तरीही घरात पाणी शिरायचेच..
गणू म्हणजे माझा RIGHT Hand त्याला मी एखादे काम सांगितले आणि त्याने केले नाही असे होणार नाही..गणू हे कर गणू ते कर.. तेव्हा मी खूप क्रूर होतो अगदी हिटलर प्रमाणे.. माझ्या भावाला आणि गणुला दिवस भर मला बॉलिंग करायला सांगायचो आणि मी बॅटिंग...
पुढे माझे कॉलेज पूर्ण झाले आणि मी मुंबईला गेलो.
काही दिवसांनी परत आलो तर गणुचे घर बंद दिसले. घरी विचारले तर रंज्या वहिनी मुलांना घेवून पुण्याला गेली म्हणून समजले.
गणू, पुनम, प्रियांका पुण्याला गेलीत कसे होत असेल त्यांचे..?गणुला शहरात कोणी मारले तर कोण वाचवेल..? असे अनेक प्रश्न मनात यायचे.
पुढे गणू शाळेत पहिला आला..चांगले मार्क मिळाले अशा बातम्या कायम कानावर पडत होत्या...
पूनमच्या लग्नाच्या वेळी मी पुण्यात रहायला आलो होतो आणि तिथून पुन्हा रंज्या वहिनी आणि गणुच्या संपर्कात आलो.
गणू आता CA सारखी प्रतिष्ठित समजली जाणारी परीक्षा देत होता..
वहिनी अजूनही घरकाम करत आहे आणि भाऊ देखील हमाली.
गणुला सुरवातीला थोडे अपयश येत होते त्यामुळे अनेक जण टीका करत होते...कशाला हा नाद लावलाय झाले तेवढे बास आता जॉब कर असे सल्ले देत होते..
काही काळ गणू देखील ह्या टिकांमुळे विचलित झालेला मी पाहिला आहे.
पण त्याची आई आणि वडील मात्र हार मानायला तयार नव्हते काहीही होऊदे कितीही वर्ष जाऊदे पण आम्हाला तुला CA झालेला बघायचे आहे.
घरकाम आणि हमाली करणारी माणसं मुलाला CA बनवण्याचे स्वप्न बघत होती ही किती मोठी गोष्ट आहे.
हल्ली 10 वी पास झाले की पालक मुलांना कामाला लागा म्हणून सांगतात पण आमची वहिनी आणि भाऊ मात्र स्वतः अजूनही राबून त्याच्या CA होण्याच्या प्रतीक्षेत आयुष्यातील एक एक दिवस कठीण परिश्रमात घालवत होते.
दोन्ही मुलींची आता लग्न झाली आहेत जावई देखील चांगले मिळालेत. वहिनीचे दोन जावई देखील प्रत्येक प्रसंगात कायम या कुटुंबाच्या मागे उभे आहेत. अगदी गनुच्या मोठ्या भावा प्रमाणे..

मागे मी वहिनी आणि भाऊ दोघांनाही आता तुम्ही गावी जावून रहा खूप थकला आहात म्हणून सांगितले तर नाही दादा पोरगा CA होत नाही तोपर्यंत गावचे नाव काढायचे नाही.
मागील काही वर्ष खूप कठीण काळातून गणू आणि त्याचे कुटुंब गेले आहे. त्यासर्व परिस्थिती वर एकमेव इलाज हा त्याचे आजचे CA होणे आहे.
दुर्गम गाव अडाणी लोकं म्हणून घिसर गावची ओळख काही लोक सांगायची पण त्याच दुर्गम भागातील अडाणी लोकांनी आज त्यांच्या मुलांना CA, वकील, इंजिनियर केले आहे.
ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

आज गणू CA ची परीक्षा उत्तीर्ण झाला.. चार्टर्ड अकाऊंटंट झाला..
ह्याचे सर्व श्रेय त्याच्या आई वडिलांचे, बहिणींचे आणि मग त्याचे आहे.
कुठलेही यश हा एक ट्रँगल असतो.. आपल्याला यशाचे शिखर चढून जाताना एक एक पायरी चढत जावी लागते ती एक एक पायरी म्हणजे आपले आई, वडील, बहीण, ह्या सर्वांचे परिश्रम आहेत.
त्यांच्या पाठीवर पाय ठेवून आपण हे शिखर चढलो आहोत.
ह्याची जाणीव गणू नक्कीच ठेवेल.
तुला CA करण्यासाठी पाठीवर 50 किलोचे पोते घेवून राबणारा बाप सतत आठव..
तुला हे स्वप्न दाखवणारी आणि त्याच्या पूर्ततेसाठी कित्येक वर्ष दुसऱ्याच्या घरी धुणे भांडी करणारी आई आठव..
पुनम, प्रियांका यांचा पाठिंबा आठव..
तुला मी हे सांगायची नक्कीच गरज नाही पण आज बोलायचे होते अनेक दिवसांपासून मी देखील या क्षणाची वाट बघत होतो.

गणू तुझ्या ह्या उत्तुंग यशासाठी तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन..!
आता सरांना Appointment घेवून भेटावे लागेल..

महेश धिंडले




Our Popular Video link ( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )

• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
   • कलेला वयाचे बंधन नसते याचे हे उदाहरण ...  

• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
   • धरणाच्या पाण्यातुन पुन्हा बाहेर आले ...  



ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews
#marathistory
#inspirationalvideo
#charteredaccountant
#interview


ANY INQUIRY
◆ Instagram Id :   / paayvata  
◆ Mail Id :
[email protected]



Music Credit
YouTube Music Library


Thanks For Watching
‎@paayvata

posted by dsp4oex