15 YouTube views, likes subscribers in 10 minutes. Free!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Chandrapur Vidhan Sabha: Kishor Jorgewar यांच्यासमोर BJP सोबतच Congress चं आव्हान गणित कसं लावणार ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #ChandrapurVidhanSabha #KishorJorgewar

नापास झालेलं पोर ९९ टक्के पडले म्हणून गावभर बोंब मारतंय, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना लक्ष्य केलं होतं. ही टीका म्हणजे जोरगेवारांनी केलेल्या टीकेला उत्तर होतं, जोरगेवार अनेकदा म्हणाले होते, 'विकासकामात मुनगंटीवार अडथळा आणतात.' या दोन नेत्यांमधला वाद विकोपाला गेला, मग यांच्यातलं सख्य गाजलं आणि आता पुन्हा एकदा वादाचीच चर्चा आहे. पण या वादासोबतच आणखी एक चर्चा आहे, किशोर जोरगेवार नेमके जाणार कुठे ?

मागच्या पाच वर्षांत महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्हीकडच्या सत्तांचा भाग असलेले किशोर जोरगेवार आता, हातात तुतारी घेणार अशा बातम्या आहेत. त्याआधी जोरगेवार यांनी भाजपचे आणि काँग्रेसचे दरवाजेही ठोठावून पाहिले आहेत, पण तिथून त्यांना दाद मिळाली नाही अशी चर्चा आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार असणारे किशोर जोरगेवार यंदा गेमचेंजर ठरणार की त्यांचाच गेम होणार ? या प्रश्नाच्या उत्तराभोवती चंद्रपूर विधानसभेचं राजकारण फिरणार आहे. मतदारसंघात नेमकं काय घडतंय ? वातावरण नेमकं कसं आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw