Secret weapon how to promote your YouTube channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Chiplun Flood Rescue : चिपळूण पाण्यात हजारो लोक अडकले बचावकार्यात अडचण

Follow
ABP MAJHA

Chiplun Flood : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर (Chiplun Flood) येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबईगोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

posted by neblokiaj