15 Free YouTube subscribers for your channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मेतकूट |मेतकूट भात |खमंग मेतकूट |Indian seasoning for rice |How to make Metkut |Baby food |मेथकुट|

Follow
Kanchan Bapat Recipes

How to make metkut
मेतकूट कसं करायचं
Traditional metkut recipe
मेतकूट रेसिपी
Kanchan Bapat recipes
Kanchan Bapat
कांचन बापट
मराठी रेसिपी
पारंपरिक मराठी पदार्थ
Traditional maharashtrian recipes

मेतकूट भात हे सगळ्या मराठी लोकांसाठी कम्फर्ट फूड आहे. देशविदेशातील कितीही प्रकारचे पदार्थ आपण खाल्ले तरी त्याला आपल्या मेतकूट भाताची सर कधीच येणार नाही. पूर्वी घरोघरी मेतकूट बनवलं जायचं. सध्या आपण ते विसरत चाललो आहोत. पण मेतकूट बनवणं अगदीच सोप्पं आहे. #Kanchanbapatrecipes
साहित्य 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, धुवुन वाळवलेले अर्धी वाटी तांदूळ, 2 टेबल स्पून गहु, 1 टेबल स्पून जीरं, प्रत्येकी 1 टीस्पून धने, मोहरी, अर्धा टेबल स्पून मेथी दाणे, प्रत्येकी 2 लवंगा, मिरे आणि लाल मिरची, पाव टीस्पून जायफळ पावडर, 1 टीस्पून हळद आणि 2 चिमुटभर हिंग#Kanchanbapatrecipes
जाड पॅनमध्ये 1 वाटी हरभरा डाळ लालसर रंग येईपर्यंत भाजा. साधारण 7 ते 8 मिनिटं. ते काढुन घेउन त्यात अर्धी वाटी उडीद डाळ गुलाबी रंग येईपर्यंत, साधारण 3 ते 4 मिनिटं, भाजून काढुन घ्यावी. धुवून वाळवलेले अर्धी वाटी तांदूळ गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घ्यावे. 2 टेबल स्पून गहु लालसर रंग येईपर्यंत, साधारण 2 ते 3 मिनिटं भाजावेत.#Kanchanbapatrecipes
पॅनमध्ये 1 टेबल स्पून जीरं, प्रत्येकी 1 टीस्पून धने, मोहरी, अर्धा टेबल स्पून मेथी दाणे, प्रत्येकी 2 लवंगा, मिरे आणि लाल मिरची हे सगळं एकत्रित खमंग भाजून घ्यावं. हे सगळं साहित्य गरम असतानाच त्यावर 1 टीस्पून हळद, 2 चिमूटभर हिंग आणि पाव टीस्पून जायफळ पूड घालावी . मिश्रण मिक्सर मधुन बारीक करून घ्यावं.
धान्याचं प्रमाण तसच ते व्यवस्थीत भाजलं जाण्यावर मेतकूटाची चव अवलंबून आहे.

#metkut #मेतकुट #मेथकुट #howtomakemetkut #मेतकुटकसंकरायचं #traditionalmaharashtrianfood #traditionalrecipes

posted by Reiliadiareum