YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Kalamnuri Vidhan Sabha:Santosh Bangar यांना महाविकास आघाडी घेरणार की मदत पॅटर्नमुळं डाव सोपा जाणार?

Follow
BolBhidu

#BolBhidu #SantoshBangar #KalamnuriVidhanSabha

बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोनतीन दिवसांमध्ये द्या.. त्यांना सांगा गाड्या करा.. त्यासाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा. ते दिवाळीसाठी येत असले तरी त्यांना सांगा येण्याजाण्याचं जे काही लागतं ते आम्हाला सांगा... हे विधान करतानाचा कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर या विधानाबद्दल बांगरांनी २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावं अशी नोटीस त्यांना निवडणूक आयोगानं पाठवल्याची बातमी आली, त्यानंतर संतोष बांगर यांनी स्पष्टीकरण दिल्याची बातमी आली, ते स्पष्टीकरण काय होतं ? तर ते म्हणाले, 'तो व्हिडिओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो. फोन पेचा अर्थ मला माहित नाही. गुगल पे सुद्धा मला माहित नाही.'

हा व्हिडीओ व्हायरल होण्याआधी बांगर यांनी आपण २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं होतं. आधी स्वतःला निष्ठेचा नांगर म्हणवून घेतल्याबद्दल आणि आता फोन पे च्या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदारसंघातलं गणित नेमकं काय आहे ? इथं बांगर ट्रॅपमध्ये अडकणार की पुन्हा बॉस ठरणार ? मतदारसंघातलं समीकरण जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw