It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

कोल्हापुरी धपाटे | धपाटे| kolhapuri dhapate |लीनाजसुगरणकट्टा

Follow
Leenas Sugrankatta

#धपाटे #कोल्हापुरीधपाटे #वनडीशमील #ज्वारीच्यापीठाचेधपाटे #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी

मिरचीचा ठेचा
तव्यावर १०१२ मिरच्या, १५२० लसणाच्या पाकळ्या आणि १ चमचा जिरे घालून छान भाजून घ्यावे. मग हे सगळे मिक्सरमध्ये घालून त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि थोडे जाडसर वाटून घ्यावे. आपला मिरचीचा ठेचा तयार आहे.

कोल्हापुरी धपाटे
४ वाट्या ज्वारीच्या पीठात २ चमचे बेसन घालावे. त्यात २ वाट्या चिरलेली कांद्याची पात, कोथिंबीर, दोन चमचे मिरचीचा ठेचा, हळद, हिंग, तीळ आणि चवीनुसार मीठ घालून सगळे नीट मिक्स करून घ्यावे. लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ थोडे सैलसर मळावे.
गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवावा.
पोळपाटावर एखादा सुती कपडा ओला करून पसरावा. त्यावर भिजवलेल्या पीठाचा एक गोळा घेऊन पाण्याचा हात लावून नीट थापून घ्यावा. थापल्यावर मधे मधे बोटाने भोके करावीत.
तव्यावर एक चमचा तेल सोडावे.
आता ते ओले कापड थापलेल्या धपाट्यासहीत उचलावे आणि धपाट्याची बाजू तव्यावर येईल अशा प्रकारे तव्यावर टाकावे. वरुन पाण्याचा हात लावावा व अलगदपणे कापड उचलावे. धपाट्याच्या बाजूने तेल सोडावे व झाकून ठेवावे. दोन तीन मिनीटांनी धपाटा उलटावा व परत बाजूने तेल सोडावे. दोन्ही बाजूंनी धपाटा शेकला गेला की गरमागरम दही आणि मिरचीच्या ठेच्याबरोबर सर्व्ह करावा.

Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

posted by Toskankahxk