The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पावसाळी वातावरण - कोंबडी वडे : घरगुती चिकन पार्टी गटारी स्पेशल | Kombadi Vade | Kokankar Avinash

Follow
Kokankar Avinash

पावसाळी वातावरण कोंबडी वडे : घरगुती चिकन पार्टी, गटारी स्पेशल | Kombadi Vade | Kokankar Avinash

दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या #गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांसमच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते.

पुढील संपूर्ण श्रावण महिना सणवार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्‍यार्‍यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.

हल्ली सोशल मीडियावरही याची खूप धूम असते. लोकं व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर आणि इतर सोशल साईट्सवर गटारीचे कार्टून, विनोद, शुभेच्छा शेअर करतात.

आज आम्ही पण आमच्या गावी थोडीशी घरगुती पार्टी करतोय. एकदम साधी आणि सोपी आहे बर का!! या तुम्ही पण आमच्यात सामील व्हा

#chickenparty #GavranChicken #chickenrecipe

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 26 July 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
_________________________________________________________________________________________________
Ashadhi Amavasya In Maharashtra :

आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे. श्रावण मास सुरु होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते. याला गटारी, आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते.

गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आले आहे. या सणाला मेजवानीचा, उत्सवाचा आणि एकत्रित मिळून साजरा करण्याचा दिवस म्हटला गेला आहे.

या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावणमास सुरु होतो. या काळात अनेकजण मासांहरी पदार्थ खाण्यास टाळतात. त्यासाठी या अमावस्येला नॉन व्हेज प्रेमी मासांहरी पदार्थांवर ताव मारताना दिसतात. गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. पारंपारिक मराठी महिन्यात, अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो.

आषाढी अमावस्या महत्त्व
आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते. आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे. पितृ तर्पण, पिंड दान आणि गायत्री पाठ यासारखे विविध विधी केले जातात.
_________________________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :
https://g.page/r/CaTODKNH5KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

posted by lobiaphahx4