Get YouTube subscribers that watch and like your videos
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत. (one Stem Pomegranate) डाळिंबश्री प्रवीण दादा माने

Follow
Akshay Sagar Maharashtra Krushi

एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत , डाळिंब क्षेत्रात नवक्रांती घडवणारा अवलिया....

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आमचे मित्र श्री प्रवीणदादा माने रा. बैरागवाडी ता. माढा, जि. सोलापूर हे डाळिंब संशोधनात उत्कृष्ट काम व शेतकऱ्यांना एक खोड लागवड पद्धतिचे मार्गदर्शन करतात.
सलग 20 वर्ष आपल्या डाळिंब बागेत विविध प्रयोग करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अजुनही नवीन प्रयोग चालू आहेत. तसेच अहमदनगर व नाशिक येथे डाळिंब बाग व्यवस्थापण ही केले आहे.

वैशिष्ट्य:
1) एक खोड डाळिंब लागवड पद्धतीत बागेतील अंतर हे 7× 11 फूट ठेवले असुन एकरी 550 झाडे बसतात.
2) एक खोड पद्धतीने झाडे 10 ते 12 महिन्यात बहार धरण्यास येतात.
3) खोड व संपूर्ण झाड यावर सूर्यप्रकाश पडतो यामुळे बुरशीजन्य रोग, खोड कीड यांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्यारोखला जातो.
4) झाडावर 70 ते80 पेन्सिल कडी प्रत्येक बहरात तयार होते त्यामुळे बाग सेटिंग एकाच वेळी होते.
5) फळांचा आकार एकसमान 300 ते 900 ग्राम पर्यंत होतो.
6) मातीपासून खोडाजवळ नेट कापड चे आच्छादन केल्यामुळे फुटवे येत नाहीत, यामुळे फुटवे काढण्याच्या खर्चात बचत होते. आणि खोडाला जखम होत नाही
7) छाटणी साठी प्रत्येक झाडाला 57 रुपये खर्च येतो.
8) औषध फवारणी, मजुर खर्च ,मशागत खर्च याचा 40% पर्यंत कमी होतो.
9) सर्व प्रकारच्या माती मध्ये हे तंत्रज्ञान अवलंबता येते.

अधिक माहितीसाठी
डाळिंबश्री प्रवीण दादा माने +91 8625863505
कृषिमित्रश्री अक्षय सागर + 91 8983206946

डाळिंबसल्ला अक्षय सागर A1
https://chat.whatsapp.com/IxbKKY6HNZR...

posted by awufakic0