15 Free YouTube subscribers for your channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

फवारणी करताना औषधांचे मिश्रण कसे तयार करावे ?

Follow
BharatAgri Marathi

▶ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

लिंक https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

‍नमस्कार शेतकरी बांधवांनो!

भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय फवारणी करताना औषधांचे मिश्रण कसे तयार करावे ?

1⃣पिकामध्ये फवारणी करताना वेळची बचत, मजुरांचा खर्च वाचवण्यासाठी आपण बऱ्याच वेळी बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्ये खत आणि संजीवके अश्या अनेक घटकांचा आपण एकत्रित वापर करतो. परंतु या सगळ्या रासायनिक घटकांचे द्रावण करताना त्यांच्या मिश्रणाची सुसंगता आणि त्याचा पिकावर होणारा परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

2⃣जसे कि असुसंगत औषधे एकत्र मिसळल्याने पाण्यात विरघळण्याची क्षमता कमी होणे, द्रावण फुटून खराब होणे, मिश्रणाचे गोळे तयार होणे, रासायनिक घटकांची अभिक्रिया होऊन औषधांचे विघटन होते. यामुळे औषधांची तीव्रता कमी होऊन पिकावर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही त्यामुळे यावर केला जाणारा खर्च वाया जातो.

3⃣एकमेकात मिसळलेली कृषिरसायने अधिक क्रियाशील झाल्यास झाडाची पाने करपणे, झाड सुकणे, पानगळ होणे यांसारख्या अनेक समस्या आपल्याला पिकात अथवा मिश्रण करताना दिसून येतात. यासाठी रासयनिक घटकांचे काळजीपूर्वक मिश्रण करणे गरजेचे आहे.

4⃣रासायनिक औषधांचे मिश्रण तयार करण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
1. मिश्रण तयार करण्यासाठी प्लास्टिक भांड्याचा वापर करावा. धातूंपासून बनलेल्या भांड्याचा वापर करणे टाळावे.
2. कीटकनाशक बुरशीनाशक व इतर रासायनिक घटकांसोबतचे माहिती पत्रक वाचून ते औषधे टँक मिश्रण करण्यासाठी शिफारस केले आहे की नाही याची खात्री करावी व शिफारस केल्यानुसार मिश्रण तयार करावे.
3. मिश्रणामध्ये सर्व औषधे शिफारशीत मात्रेचाच वापर करावा.

5⃣ मिश्रण करतांना औषधांची क्रमवारी पुढील प्रमाणे तंतोतंत पाळावी.
1. ड्रम मधील स्वछ पाण्यात पावडर, भुकटी, दाणे युक्त औषधे टाकावीत व मिश्रण लाकडी काठीने ढवळत राहावे. यामध्ये WP DF WP WG/WDG SP SG फॉर्मुलेशन असणारी औषधे दिलेल्या क्रमानुसारच एकत्र करावीत.
2. पाण्यात वाहणारे म्हणजे लिक्विड औषधे टाकावीत यामध्ये CS SC FL SL EC SE फॉर्मुलेशन असणारी औषधे दिलेल्या क्रमानुसारच एकत्र करावीत व द्रावण काठीने हलवावे.
3. तयार द्रावणात स्टिकर, स्प्रेड्रर चा वापर करावा.
4. तेलवर्गीय तरंगणारे औषध टाकावे जसे OD फॉर्मुलेशन असणारे (उदा निम तेल) घटक.
शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात विद्राव्ये खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.

6⃣कृषीरसायनांमध्ये ऑरगॅनोफॉस्फेट ग्रुप मधील कीटनाशके उदा. क्लोरोपाइरीफॉस, प्रोफेनोफॉस, डायक्लोरोवोस, पॅराथिऑन आणि फेनीट्रोथिऑन इत्यादी औषधे कॉपर आणि सल्फर युक्त कृषिरसायनासोबत मिसळू नये.

7⃣मिश्रण तयार करताना 2 ते 3 पेक्षा जास्त औषधे एकत्र करणे टाळावे. अशाप्रकारे तयार केलेले मिश्रण पिकावर वापरण्यासाठी योग्य असेल.

तुम्हाला हा व्हिडीओ आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला ‍♂ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस

भारतअ‍ॅग्री ऍप http://bit.ly/2ZyV2yl
फेसबुक हिन्दी https://bit.ly/36KuGOe'>https://bit.ly/36KuGOe
फ़ेसबुक मराठी https://bit.ly/36KuGOe'>https://bit.ly/36KuGOe
इंस्टाग्राम https://bit.ly/3B9Ny8G
वेबसाइट www.bharatagri.com
लिंक्ड इन https://bit.ly/3TWtK0Z
भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल https://bit.ly/3Ryf3zt
भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

posted by propisano5p