Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

ratangad fort trek राघोजी भांगरे यांच्या इतिहासाविषयी... संपूर्ण माहितीसह

Follow
TRAVELLER JAIRAM

#रतनगड_सह्याद्रीतील_एक_दुर्गरत्न

#TRAVELLER_JAIRAM

डोंगर रांग पाश्चिम घाट

प्रकार गिरीदुर्ग

उंची 4250 फुट समुद्र सपाटीपासून

पायथ्याचे गाव रतनवाडी ता.अकोले जि. अहमदनगर

चढाईश्रेणी मध्यम

पाहण्याची ठिकाणे अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, गणेश दरवाजा, रत्नाबाई मंदिर, मोठी गुहा (मुक्कामाचे ठिकाण), कडेलोट पॉइंट, राणीचा हुड्डा, अंधार कोठी, कल्याण दरवाजा, बारा तलाव, नेढे गडावरील सर्वोच्च ठिकाण, त्र्यंबके दरवाजा... बालेकिल्ला... वरती देखील काही पाण्याची टाकी बघण्यासारखी आहेत. त्याचप्रमाणे गडावरील वाड्यांचे काही अवशेष आहेत.

 भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी सप्टेंबर ते जानेवारी

गड प्रेमींना TRAVELLER_JAIRAM चा सस्नेह नमस्कार,

     रतनगड बर्‍याच दिवसांपासून खुणावत होता,परंतु काही कारणास्तव ट्रेक मिस होत होता;आज मात्र नक्की जायचे असा पक्का निर्धार केला आणि शनिवारी संध्याकाळी नियोजन करून नेहमीच्या ट्रेकर्स यांना कॉल केला बर्‍याच मित्रांनी नकार कळवला, कारण त्यांनी हा ट्रेक अगोदरच केला होता. आम्ही सहा जण जमलो आणि रविवारी पहाटे सहा वाजता नाशिकहून निघालो.

      नऊ वाजता रतन वाडी येथे पोहोचत असतानाच रस्त्यातच गाडी थांबवली, रतन गड असा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला दिसला. उजव्या हाताला डोंगर उतारावर एक छोटेसे टुमदार घर, आम्ही महाले सरांना विचारायला पाठवले. ते विचारून येताच, आम्ही तेथेच गाडी पार्क केली. येथेच आम्हाला भेटले आजच्या ट्रेक चा वाटाड्या... सोमनाथ काका वयाने पन्नासी गाठलेला उंच आणि गोल चेहरा,मध्यम शरीरयष्टी वर्ण काळा सावळा गळ्यात टॉवेल आणि हातात बांबूची काठी....ऐकायला थोड कमी असणारा...

         सव्वानऊ वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली.  दोनशे मीटर चालून झाल्यावर काकानी सर्वांना थांबायला सांगितले...हळूच खिशात हात घातला आणि आल्यासारखी दिसणारी वनस्पती प्रत्येकास दिली. मला अगोदर थोड अवघडल्यासारखे वाटले.. मग काकानी म्हटले कोणताही विचार न करता खा. पुढील ट्रेक साठी याचा उपयोग होईल... तो तुकडा तोंडात टाकून आम्ही भरभर चालायला सुरुवात केली.  काका पुढे चालत होते मागून आम्ही... हळूहळू आम्ही काकांना गडा विषयी माहिती विचारू लागलो. काकांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पासून सुरुवात केली... आणि मग थेट त्यांचा.........जीवनपट. पुढे गडाविषयीच्या बारीक सारीक गोष्टी जाणून घ्यायला सुरुवात केली. या गप्पांच्या ओघात आम्ही जवळ जवळ दीड तास चालतच होतो.

       गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर कारवीच्या गर्द झाडीमध्ये काही पडक्या वाड्यांचे अवशेष दिसतात. पुढे कासराभर अंतर चालून गेल्यावर झोपडीवजा दोन तीन घरे दिसतात. येथे आपल्याला नाश्ता, जेवणाची सोय आहे. येथूनच दोन वाटा फुटतात डाव्या बाजूची वाट हरिश्चंद्र गडाकडे जाते या वाटेने सरळ शंभर फुट पुढे गेले की दोन पाण्याची टाकी बघण्यासारखी आहेत. यातील पाणी अगदी आरशासारखे पारदर्शक आणि तितकेच मधुर आहे. तर दुसरी वाट उजव्या हाताला आहे. ही वाट आपल्याला थेट रतन गडावर घेऊन जाते.   

        पुढील वाट ही चढणीची असून दहा पंधरा मिनिटे चालून गेल्यावर पुढे शिडी मार्ग लागतो. येथे कातळकड्यात या दोन शिड्या चढाव्या लागतात. पूर्वीचा मार्ग देखील या ठिकाणी आहे. परंतु तुटलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणी वनविभागाने शिडी मार्ग बसवलेला दिसतो. थोडेच अंतर चालून गेल्यावर उजव्या हाताला पुढे गेले की या ठिकाणी कातळकड्यात मोठ्या दोन गुहा कोरलेल्या दिसतात. यातीलच एका गुहेत गडावरील रत्ना देवीचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेऊन, आपण पुढे वळलो की, दुसर्‍या गुहेत स्थानिक मंडळीनी येथे गडावर येणार्‍या पर्यटकांसाठी चहा, नाष्टा, झुणका भाकर अगदी माफक दरात उपलब्ध करून दिले आहे.  येथेच गडावरील मुक्कामाची जागा आहे.

        येथे जेवण करून झाल्यावर आम्ही गणेश दरवाजाने गडावर प्रवेश केला.  पुढे गेल्यावर आपल्या नजरेस एका पडक्या वाड्यांचे अवशेष दिसतात, यालाच राणीचा हुड्डा असे म्हणतात. येथूनच डाव्या हाताला पुढे गेले की, कडेलोट पॉइंट आहे.  आणि येथूनच समोर दिसणारा नजारा जणू स्वर्गच........ सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात गड सुंदर भुई कारवीच्या आणि सोनकीच्या फुलांनी अगदी स्वर्गासारखा भासतो, हे दृश्य पाहून गडावर आल्याचे सार्थक वाटते. येथूनच दर्शन होते गवळदेव मुंढा, कात्राबाई, पाचघर, आजोबा पर्वत याचे हा नजारा डोळ्यात साठवून आपण मागे पाश्चिमेला निघालो. येथूनच कोकण,  म्हणजे कल्याण दरवाजा लागतो, पुढे अंधार कोठी, बारा तलाव आणि त्र्यंबक दरवाजा........मित्रहो याचे वर्णन शब्दात मांडणे खरच खूप खूप कठीण आहे... याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला या गडाला नक्की भेट द्यावी लागेल......

         वरील अनुभव घेण्यासाठी आपला व्हिडिओ TRAVELLER_JAIRAM या YouTube channel वर उपलब्ध आहे तो नक्की बघा आवडल्यास SUBSCRIBE LIKE आणि SHARE करायला विसरू नका.

✒#TRAVELLER_JAIRAM

धन्यवाद!....  जय शिवराय... जय राघोजी....

Traveller jairam या YouTube channel च्या माध्यमातून इतिहासाचा किंवा कुठल्याही पौराणिक वास्तूंचा अपप्रचार व्हावा हा चॅनेल चा उद्देश किंवा हेतू नाही. इतिहासाचा किंवा पौराणिक वास्तूंचा प्रचार आणि प्रसार हाच एकमेव केवळ प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. सदर व्हिडिओ मधील दाखवली जाणारी माहिती ही स्थानिक रहिवाशी यांच्याकडून घेतली आहे या माहितीशी चॅनलचा कुठलाही सबंध नाही. सदर व्हिडिओ मधील आख्यायिका या मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. त्याला कुठलाही लिखित पुरावा नसतो; यावर विश्वास ठेवणे ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. या माहितीशी चैनलचा कुठलाही संबंध नाही.

DISCLAIMER
This video is intended for educational purposes only. The content presented is based on the creators knowledge and research at the time of production.
Under section 107 of the copyright Act 1976 allowance is made for FAIR USE for purpose such a as criticis

posted by bu1sie4